चिक्कोडी तालुक्यातील शमणेवाडी गावातील मालू केंचप्पा गावडे या मेंढपाळांच्या , 9 मेंढ्यांचा रासायनिक खते खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या मेंढपाळाने , प्रत्येकी 14,500 रु. प्रमाणे 10 मोठ्या मेंढ्या आणि 10 लहान मेंढ्या विकत घेतल्या होत्या. त्यांना गावापासून थोडं लांब असलेल्या नेज गावाजवळच्या शेतात चरायला सोडलं होतं. मात्र मालू जेवणासाठी घरी गेले तोपर्यंत उसाच्या शेतात टाकलेले युरिया खत खाल्ल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाला.
घ टनेची माहिती मिळताच चिक्कोडी शासकीय पशु विभागाचे सहाय्यक अधिकारी डॉ.अरुण सांगोला यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि गुन्हा दाखल केला.
मेंढ्यांच्या मृत्यूमुळे , मेंढपाळाचे १.३५ लाख रु.चे नुकसान झाले आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी शासन व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळावी , अशी मागणी मेंढपाळ समाजाने केली आहे.
यावेळी ग्रा.पं.चे उपाध्यक्ष भाऊसाहेब खोता, ग्रा.पं.चे माजी सदस्य कल्लाप्पा पुजारी, जयकुमार हेरगे, बाहुबली शिरगुप्पे, मलप्पा गावडे, ग्रा.पं.चे सदस्य महावीर पुजारी, राजू कामटे, बनप्पा पुजारी, हिरीकुडे, निंगाप्पा कोळेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments