बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी मार्केट, कॅम्प परिसरात जोरदार प्रचार केला.
बेळगाव शहारत , सकाळपासून भाजपने मतदानाचा दौरा केला आहे. उत्तरा विधानसभा मतदारसंघातील कॅम्प , मार्केट परिसरात अभूतपूर्व पाठिंबा दिसून आला.बाजारातील दुकानांमध्येही प्रचार केला.मिठाई वाटल्याने कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला. यावेळी डॉ रवी पाटील यांच्यावर , फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करून , समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी पुन्हा कमळ फुलणार, असा विश्वास व्यक्त केले .
यावेळी डॉ रवी पाटील यांनी गल्लीबोळात जाऊन मतांचा प्रचार केला.
भाजपचे उमेदवार रवी पाटील यांनी याआधीही अनेक सेवा केल्या असून बेळगाव शहरातील पाणी स्वच्छता, आरोग्य या सर्व समस्यांना ते प्राधान्य देत असल्याचे मत जनतेने व्यक्त केले.

यावेळी भाजपचे उत्तर मतदारसंघाचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांना विजयी करणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगितले.
विशाल किल्लेदार आणि डॉ.रवी पाटील धर्मपत्नी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.


Recent Comments