तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेस आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी मतदारांचा त्यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला.

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व महिला सक्षमीकरणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी प्रचार केला.

याप्रसंगी मतदारांनी त्यांचे भव्य स्वागत करून अभूतपूर्व पाठिंबा व्यक्त केला. त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना दिली व 10 तारखेला काँग्रेस पक्षाला मतदान करून खानापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


Recent Comments