Belagavi

पंचमसाली आंदोलनात सहभागी झालेल्या समाज नेत्यांच्या घरी जयमृत्युंजय स्वामीजींनी दिली भेट

Share

जयमृत्युंजय स्वामीजींनी पंचमसाली आंदोलनात सहभागी झालेल्या समाज नेत्यांची भेट घेतली.

कुडल संगमचे जयमृत्युंजय महास्वामी हे गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात पंचमसाली आरक्षणासाठी लढा देत आहेत.राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या आरक्षणाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचे मान्यतेचे पत्र मुख्याधिकारी यांच्याकडून प्राप्त झाले. त्यामुळे स्वामीजी , या लढ्यात सहभागी झालेल्यांचे अभिनंदन करण्यासाठी राज्यातील विविध भागातील समाज नेत्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.


प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर, राज्यात निवडणूक असल्याने कोणताही सभा समारंभ न घेता आमच्या लढ्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या पंचमसाली नेत्यांच्या घरी जाऊन आम्ही अभिनंदन करत आहोत. यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नाही .

यावेळी बेळगाव जिल्हा पंचमसाली समाजाचे अध्यक्ष एस.के.पाटील, युवा नेते गुंडू शिवगौडा पाटील, सुभाष नाईक, जयगौडा पाटील, गुरु पाटील, डॉ.बी.एस.पाटील, गिरीश पाटील आदी उपस्थित होते.

Tags: