भव्य रोड शो, पदयात्रा काढून केले पाठिंब्याचे आवाहन
महिलांनी हळदी कुंकू देऊन दिल्या विजयासाठी शुभेच्
सांबरा, हिंडलगा येथे लक्ष्मी हेब्बाळकर यांना प्रचंड जनसमर्थन
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारसंघातील विविध भागात प्रचार सुरू ठेवला आहे. सर्वत्र अपेक्षेपलीकडे लोकांचा पाठिंबा दिसून येत असून, त्यामुळे विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे.

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी सायंकाळी सांबरा गावात रोड शो केला. या रोड शोमध्ये हजारो लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोकांनी हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सांबराच्या गल्लीबोळात रोड शो झाला. संपूर्ण गावात जत्रेचे स्वरूप आल्याने लोकांनी एकत्र येत लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विजयाचे मताधिक्य मागील वेळेपेक्षा जास्त असेल असा विश्वास व्यक्त केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वाहनातून खाली उतरून ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. महिलांनी हळदी कुंकू अर्पण करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मागील निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने मी पूर्ण केली आहेत. घरची मुलगी म्हणून मी तुमच्या सुख-दुःखात तुमच्या पाठीशी आहे. आणखी एक संधी द्या. या भागाचा आणखी विकास करूया. आगामी काळात मी शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवांना सर्वोच्च प्राधान्य देईन. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत न चुकता माझ्या नावापुढील 4 क्रमांकाचे बटण दाबून मला मतदान करा अशी विनंती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारांना केली.
पायी जाणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि अनेक स्थानिक नेते होते. तरुण जल्लोष करत होते. लक्ष्मीअक्का आपला विजय निश्चित असल्याच्या घोषणा देत होत्या. हिंडलगा येथे बाईक रॅली
हिंडलगा येथे सोमवारी सकाळी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो लोकांनी सहभाग घेऊन मतांची मागणी केली. शिवम नगर येथून निघालेली बाइक रॅली विजयनगरपर्यंत चालली.

मागील काळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मी मतदारसंघात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांच्या अपेक्षा मी पूर्ण केल्या आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या वेळी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक जयजयकाराच्या घोषणा देत होते


Recent Comments