मतदारसंघातील प्रत्येक गावात मी अनेक कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. ही विकासकामेच या निवडणुकीत माझे संरक्षण असल्याचे माननीय मुजराई हज व वक्फ मंत्री तथा निपाणी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांनी सांगितले.

निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील बुदलमुख आणि पांगेरी बी गावांमध्ये प्रचार करण्यात आला . यावेळी शशिकला जोल्ले म्हणाल्या कि , मी आमदार म्हणून गेल्या दोन टर्ममध्ये बुदलमुख गावात 10 कोटी 40 लाखाहून अधिक तर पांगेरी-बी गावात 13 कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे केली आहेत. मी गावात रस्ते, गटारी , घरोघरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी, मंदिराची देखभाल अशी अनेक कामे केली आहेत. तुम्ही मला नेहमीच क्षेत्रात विकासकामे करण्याची संधी दिली आहे.

मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास मी सार्थ ठरवला आहे. ही सर्व विकासकामे माझ्यासाठी श्रीरक्षा असून या निवडणुकीत मतदार मला साथ देतील, असे त्या म्हणाल्या .

मतदारसंघातील भाजप नेते आणि शेकडो महिलांनी निवडणूक प्रचारात भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा दिला.


Recent Comments