बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी आज मतदारसंघातील विविध भाग कार्यकर्त्यांसमवेत पिंजून काढत जोरदार प्रचार केला. चाय पे चर्चा हा उपक्रम राबवून त्यांनी मतदारांना निवडणूक लढविण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपचे उत्तर मतदारसंघातील उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी देखील रविवारची पर्वणी साधत विविध भाग पिंजून काढत जोरदार प्रचार केला. आ. अनिल बेनके यांच्या उपस्थितीत सकाळी 6.30 वाजता श्रीनगर साई मंदिराजवळ त्यांनी ‘चाय पे चर्चा’ उपक्रम राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या.

बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर सन्मान हॉटेल, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, गणाचारी गल्ली, रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्ली, रामदेव गल्ली, केळकर बाग, किर्लोस्कर रोड, अनसूरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली व इतर अनेक ठिकाणी प्रचार केला. बाईट बेनके.
डॉ. रवी पाटील यांनी बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्रचार केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, लोकांचा आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा दिसून येत आहे. लोक स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत आहेत.कार्यकर्ता हीच आमची ताकद आहे.
भाजपचे नेते प्रचाराला येत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोक स्वेच्छेने प्रचाराला येत असून चांगला प्रतिसाद देत आहेत. या वेळी राज्यात पुन्हा कमळ फुलणार आहे असे ते म्हणाले. बाईट रवी पाटील
यावेळी भाजपचे प्रसारमाध्यम समन्वयक शरद पाटील, रणजित रोकडे, बाभूराव कुट्रे, गोपाळ सांबरेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments