election

काँग्रेस पक्षाची गॅरेंटी पूर्णपणे फसवी आहे. गॅरेंटी पूर्ण करणार असाल तर ६० हजार कोटींची गरज आहे: आमदार भालचंद्र जारकीहोळी.

Share

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्ड देण्याची घोषणा केली आहे, हे पूर्णपणे खोटे असून त्यांनी दिलेले गॅरंटी पूर्ण करण्याकरिता ६० हजार कोटीची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित आहे हे ओळखून गॅरंटी कार्डची घोषणा केली आहे. मतदार बांधवांनी त्या भुलथापाला बळी पडू नये असा विचार माजी मंत्री तसेच अरभावी मतदारसंघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी कागवाड मतदार संघातील मदभावी येथे कागवाडचे उमेदवार आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात भालचंद्र जारकीहोळी बोलत होते.

आम्हाला वाघ म्हणू नका:

आमदार भालचंद्र जारकीहोळी बोलताना म्हणाले की, काही कार्यकर्ते आपल्या भाषणातून जारकीहोळी यांना बेळगावचा वाघ म्हणून संबोधले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून बोलताना म्हणाले की, मी कधीच वाघ नाही. वाघाकडे लोक जात नाहीत, मी व श्रीमंत पाटील दोघेही गाय आहोत. गाय माघून लाथ मारत नाही आणि पुढेही डोशा मारत नाही. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची काम करून त्यांच्या सुखदुःखात पाठीशी असतो. त्यामुळे श्रीमंत पाटील सारख्या आमदाराला गमावू नका असा सल्ला यावेळी दिला.

खिळेगाव बसवेश्वर पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी श्रीमंत पाटील यांनी करीत असलेले प्रयत्न खरोखरच आगळे वेगळे आहे. त्यांच्या कामामध्ये काहींनी अडथळा आणला होता. तरीही स्वस्त बसले नाहीत तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सतत आहेत. त्यांना यश हे निश्चितच आहे. यामुळे येथील मतदार बांधवांनी पाणी समस्या सोडवून घेण्यासाठी श्रीमंत पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे सांगितले.

भाजपा पक्षाचे उमेदवार तसेच आमदार श्रीमंत पाटील यांनी बोलताना म्हणाले की, खिळेगाव बसवेश्वर पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याकरिता मी पुरेसा प्रयत्न केला आहे. पण मला राजकीय लोकांनी अडथळा आणला आहे, तरीही मी हार न मानता प्रयत्न केला आहे. राज्य शासनाकडून मुदतीत निधी मिळणार नाही हे समजताच सहा कोटी रुपये उपलब्ध करून देऊन काम सतत चालू ठेवला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी योजना चालू करायचे होते. सध्या ती योजना पूर्ण झालेली आहे. लवकरच कार्यान्वित होईल असे सांगितले.

 

अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, मदभावी येथील एका कार्यक्रमांमध्ये मी बीजेपी पक्षाचे वतीने निवडणूक लढवणार. आमदार श्रीमंत पाटील यांना कागवाड मतदार संघातून लढविणार, त्यांच्या विरोधात जरी माझा मुलगा निवडणूक लढविला तरी त्याला विरोध करेन असे सांगणारेच पक्ष सोडून जाऊन माझ्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहेत. येथील सिद्धेश्वर देवळात या तेथे शपथा करूया असे आव्हान श्रीमंत पाटील यांनी केला आहे.

या निवडणुकीमध्ये सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगून मदभावी येथील विनायक बागडी बीजेपी पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे फार मोठा फरक पडणार असल्याचे सांगत होते. विशेष म्हणजे ते घाण निघून गेले आहे. त्यांच्यापेक्षाही अत्ता मोठा पाठिंबा येथील लोक आपल्या कडे व्यक्त करीत असल्याचे सांगितले.

मला निवडणुकी पेक्षा येथील शेतकऱ्यांच्या समस्या असलेल्या बसवेश्वर पाणीपुरवठा योजना लवकरच प्रारंभ करून शेतकऱ्यांच्या विकासाला हातभार लावणार आहे. येथील ९८ वर्षाचे एक शेतकरी गावांमध्ये आहेत, त्यांची शेवटची इच्छा पाणीपुरवठा योजनेतील पाणी बाहेर पडतानाचे ते बघणार आहेत. त्यांची इच्छा मी पूर्ण करणार आहे असे ते सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये केएमएफ चे संचालक आप्पासाहेब अवताडे, महादेव कोरे, आर.एम.पाटील, मुरिगेप्पा मगदूम नुकतेच काँग्रेस पक्षातून बीजेपी पक्षांमध्ये प्रवेश केलेले तमन्ना पुजारी, ईश्वर कुंबारे यांची भाषणे झाली.

आमदार श्रीमंत पाटील यांचे सुपुत्र योगेश पाटील व सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

या समारंभामध्ये मदभावी सह परिसरातील गावातून बहुसंख्येने काँग्रेस व जेडीएस पक्ष सोडून बीजेपी पक्षांमध्ये मोठ्या संख्येत युवकांनी प्रवेश केला. यामुळे मदभावी परिसरामध्ये आमदार श्रीमंत पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त होत असताना दिसत आहे.

Tags: