बेळगाव उत्तर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, शहरात समर्पक पाणीपुरवठा, स्वच्छता प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी, दर्जेदार रस्ता विकास आणि सर्व वर्गाचा विकास याचबरोबर तरुणाना रोजगार निर्मितीचे स्वप्न घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाचे उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांनी शहराच्या शिव बसवनगर भागात प्रचार केला
यावेळी त्यांनी सकाळी शिवबसव नगर येथील नागरिकांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करून देण्याची विनंती केली. यावेळी विद्यमान आमदार अनिल बेनके, खा. मंगला अंगडी आणि डॉ रवी पाटील यांच्या पत्नी सुनीता प्रचारात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सर्वांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताने विजयी करण्याची विनंती नागरिकांना केली.
त्यानंतर डॉक्टर रवी पाटील यांनी सायंकाळी देखील शहराच्या विविध भागात प्रचार केला आणि भाजपचे हिंदुत्वाचे स्वप्न भारतीय जनता पक्षाला मत घालून साकार करू असा विश्वास दिला. यावेळी नागरिकांनी देखील त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
दरम्यान, उद्या डॉक्टर रवी पाटील उद्या आपला प्रचार अशोक नगर परिसरात करणार असून सायंकाळी ते शाहूनगर, जयनगर, महाबळेश्वर नगर, कुवेंपु नगर, मुरलीधर कॉलनी येथे आपला प्रचार करणार आहेत.


Recent Comments