बेळगाव उत्तर मतदारसंघाचे जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे . त्यांची पत्नी रोहिणी मुगळीहाळ यांनीदेखील जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे .
बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी , शिवानंद मुगळीहाळ हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत . जेडीएस पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत . मतदार संघातील विविध भागात त्याची जोरदार प्रचार मोहीम सुरु आहे . त्यांची पत्नी रोहिणी मुगळीहाळ या देखील आपल्या पतीच्या विजयासाठी मतयाचना करीत आहेत .
उत्तर मतदारसंघातील हनुमान नगर , वैभव नगर तसेच प्रेस कॉलनी भागात रोहिणी मुगळीहाळ यांनी मतदारांच्या घरोघरी भेट देऊन , मतयाचना केली .
जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना मतदारांचाही चांगला पाठिंबा लाभत आहे . ७० वर्षे राज्य केलेले काँग्रेस आणि भाजप सरकारच्या धोरणाना जनता कंटाळली आहे . जनतेला बदल हवा आहे . यावेळी जनता जेडीएसला नक्की निवडून देऊन कुमार स्वामी यांचे हात मजबूत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
यावेळी जेडीएस चे शेकडो कार्यकर्ते तसेच शिवानंद मुगळीहाळ यांचे समर्थक उपस्थित होते .


Recent Comments