खानापूर तालुक्यातील दोड्ड होसूर, बलोगा, गांधीनगर या गावांमध्ये घरोघरी जाऊन आ . अन्जली निंबाळकर यांनी , मतदार संघात केलेल्या पाच वर्षांच्या विकासकामांचा विचार करून मला पुन्हा एकदा सेवा करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मतदारांना केली.


पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत,

काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्याची योजना आहे. म्हणून दोनशे युनिट वीज मोफत पुरवठा करण्यात येणार आहे . यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतयाचना केली .
या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments