election

विकास कामामुळे मतदार संघातील जनता मलाच आशीर्वाद करेल- सौ. शशिकला जोल्ले – मतदारसंघात जोरदार प्रचार – मतदारांचा मोठा पाठिंबा

Share

निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दोन टर्ममध्ये अथक परिश्रम घेतले असून, जनतेच्या बहुतांशी मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. दोन हजार कोटींची विकास कामे केल्यामुळे मतदारसंघातील जनता यंदाही मलाच आशीर्वाद करेल असे प्रतिपादन सौ. शशिकला जोल्ले यांनी केले.

निपाणी मतदारसंघातील हनबरवाडी, दत्तवाडी, शेंडुर, गोंदीकोप्पी या गावांमध्ये त्यांनी प्रचार केला.


यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या दोनवेळा आमदार म्हणून निवडून येऊन मतदारसंघात विकासकामे करण्याची संधी दिली आहे. मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे. गेल्या 10 वर्षात 2 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची विकासकामे करण्यात आली आहेत. मी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. याबरोबरच या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. या सर्व कामांच्या पार्श्‍वभूमीवर मतदार संघातील मतदार पुन्हा मलाच आशीर्वाद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सर्जेराव पाटील, आनंदराव पाटील, बाजीराव भोसले, पांडुरंग पाटील, महादेव सुतार, गणपती चौगले, आत्माराम चौगले, संतोष नाईक, प्रवीणा गिरी पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नेते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: