Belagavi

खानापूरच्या भाजप-जेडीएस कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Share

खानापूर तालुक्यातील शेकडो भाजप-जेडीएस कार्यकर्त्यांनी आ. अंजली निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन पक्षत्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पारिशवाडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आ. अंजली निंबाळकर आणि काँग्रेस निरीक्षक काझी निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांत खानापूर तालुक्याचा आमूलाग्र विकास केला आहे. गेल्या कित्येक वर्षांत न झालेली कामे त्यांनी करून दाखवली आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात. समाजातील विविध वयोगटातील घटकांसाठी युवा आणि महिलांसाठी क्रीडास्पर्धांपासून विविध उपक्रम त्या अंजलीताई फौंडेशनच्या माध्यमातून राबवित असतात. कसलाही बडेजाव न दाखवता साधेपणाने लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या या धडाक्याने प्रभावित होऊन खानापूर तालुक्यातील शेकडो जेडीएस व भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांचे नेतृत्व स्वीकारले.

काँग्रेसचे पक्ष निरीक्षक काझी निजामुद्दीन आणि आ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजप-जेडीएस पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पारिशवाडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. लक्केबैल, देवलत्ती, कामशीनकोप्पा, आवरोळी, बोगूर, हिरेमुनवळ्ळी, चिक्कमुनवळ्ळी, पारिशवाड, कग्गनगी आदी गावांमधील सुमारे 100 युवकांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आ. अंजली निंबाळकर आणि काँग्रेस निरीक्षक काझी निजामुद्दीन यांनी पक्षध्वज आणि शाल घालून त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. फ्लो कार्यकर्त्यांनी ‘आमदार अंजली निंबाळकर की जय’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’चा नारा देत पुन्हा एकदा अंजली निंबाळकर यांना आमदार करण्याची शपथ घेतली.

Tags: