खानापूरहून नंदगडच्या दिशेने , लालवाडीजवळ , दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने, दुचाकी घसरून पडल्याने , जखमी झालेल्या दुचाकीवरील व्यक्तीला काँग्रेसचे अनिल सुतार यांनी मदत केली .

सदर मार्गाने नंदगडकडे येत असलेले काँग्रेस नेते अनिल सुतार यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तात्काळ गाडी थांबवून जखमींना नंदगड, हलगा गावच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले .
माजी पंचायत अध्यक्षा सावित्री मादार यांनाही याबाबत माहिती दिली व त्यांनी प्रचारासाठी जात असताना प्रथमोपचार करण्यात मदत केली. त्यांनी रात्रीच्या वेळी अपघातात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करून माणुसकी दाखवली.
यावेळी अश्विनी होसुरी,सावित्री मादार ,राजश्री चौहान,महांतेश कल्याणी यांनी जखमींची काळजी माणुसकीचे दर्शन घडवले .


Recent Comments