Belagavi

काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ यांचे सुपुत्र अमान सेठ यांनी केला वडिलांचा प्रचार

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ यांचे सुपुत्र अमान सेठ यांनी आपल्या वडिलांचा प्रचार केला . प्रचारादरम्यान आसिफ सेठ याना मतदारांनी पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला .
व्हॉईस ओव्हर : बेळगाव उत्तरचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ यांचे सुपुत्र आसिफ सेठ यांनी , वीरभद्रनगर भागात भेट देऊन , आपल्या वडिलांचा प्रचार केला . या भागातील घरोघरी त्यांनी भेट दिली . यावेळी इथल्या रहिवाशांनी त्याचे मनःपूर्वक स्वागत केले

प्रचारावेळी महिला तसेच तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता . यावेळी वोट फॉर काँग्रेस अशा घोषणा देण्यात आल्या . यावेळी काँग्रेसची पत्रके वाटप करण्यात आली

प्रचारादरम्यान आपली मराठीला माहिती देताना , अमान सेठ यांनी , बेळगाव उत्तर मतदारसंघातून आसिफ सेठ याना उत्तम पाठिंबा लाभत असल्याचे सांगितले . निव्वळ मुस्लिम समाजच नाही तर अन्य समाजाकडून देखील सर्मथन लाभत आहे . मतदारसंघातील पाणी समस्या दूर करणे , गरिबांना विविध योजनांतर्गत घरे बांधून देणे , आरोग्य शिबिरांच्या आयोजनासहित , मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे . शिवाय काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार कार्यक्रम अमलात आणण्याचे कार्य केले जाणार आहे . हे सर्व जनतेच्या पाठिंब्यानेच शक्य होणार आहे . मतदारसंघातील जनतेचा यासाठी चांगला पाठिंबा लाभत असल्याचे ते म्हणले .


एकंदर बेळगाव उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ यांच्या प्रचारासाठी त्यांचा सुपुत्र
अमान सेठ प्रचार मैदानात उतरले आहेत .

Tags: