Belagavi

रवी पाटील यांची शाहुनगर, बीके कंग्राळी परिसरात जोरदार प्रचारमोहीम

Share

भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तरमधील उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी शाहुनगर, बीके कंग्राळी रोड आदी परिसरात जोरदार प्रचारमोहीम राबवली.

बेळगाव उत्तर मतदार संघातील विविध उपनगरात डॉ. रवी पाटील यांनी झंझावाती प्रचार सुरु केला आहे. पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांसमवेत त्यांनी शाहुनगर, बीके कंग्राळी रोड आदी परिसरात जोरदार प्रचारमोहीम राबवली. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांनी भेटी घेतल्या. तसेच मतदारांना भाजप जाहीरनाम्याचे व प्रचारपत्रकांचे वाटप करून संवाद साधला.

उत्तर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणूक लढवत आहे. राज्यात आणि देशात भाजप सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. तो विकास पाहून आपणाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विविध व्यावसायिक आणि भाजीविक्रेत्यांशीही थेट संपर्क साधून त्यांनी निवडून देण्याचे आवाहन केले.


यावेळी मतदारांनी डॉ. रवी पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केल्याचे दिसून आले. अनेक मतदारांनी ‘जय बीजेपी’ असे लिहून त्याखाली भाजपचे पक्षचिन्ह कमळाची सुबक रांगोळी रेखाटली होती. महिलांनी डॉ. रवी पाटील व त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचे आरती ओवाळून स्वागत केले.

Tags: