Belagavi

बेकवाड गावात आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांना भरघोस पाठिंबा

Share

खानापूर तालुक्यातील बेकवाड गावात आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला.

यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव संतोष हंजी म्हणाले की, खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर या यावेळी मंत्री होण्याची पूर्ण शक्यता आहे.माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच आश्वासन दिले आहे. सत्तेत आल्यावर 5000 कोटी देऊन, तुमच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करू . त्यामुळे येत्या 10 तारखेला काँग्रेस पक्षाला ओळखून मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, अशी विनंती त्यांनी केली.


काँग्रेस पक्ष, गरिबांचा काँग्रेस पक्ष, राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर , घराघरात दोनशे युनिट मोफत वीज पुरवठा करणार आहे . अन्नभाग्य योजना उत्तमरीत्या राबवणार आहे .आता बघा गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे याला आळा घालण्यासाठी काँग्रेस पक्षाची सत्ता येणे गरजेचे आहे. असे कॉग्रेसच्या उमेदवार डॉ . अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या .

बेकवाड गावातील एका महिलेने सांगितले की, कोणी काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या ताईलाच मत देऊ. इंदिरा गांधी होत्या तेव्हा काँग्रेस पक्षाने आम्हाला घरे दिली, त्यामुळे आम्ही त्यांना आमचे मत देऊ.

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते अनिल सुतार, महांतेश कल्याणी, शफी काझी, अल्ताफ बसारीकट्टी, संतोष हंजी, सावित्री मादार , अश्विनी होसुरी , मारुती भेकणे तमन्ना कोलकार, श्वेता , साहीश सुतार, राजश्री चौहान, महेश आदींसह युवा व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: