Belagavi

उत्तरमध्ये काँग्रेसचे राजू सेठ यांचा झंझावाती प्रचार

Share

बेळगाव उत्तर मतदार संघातील कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी झंझावाती प्रचार सुरु केलाय. विविध उपनगरांत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर देत निवडून देण्याचे आवाहन ते करत आहेत. या दरम्यान, मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार करून भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे.

बेळगाव उत्तर मतदार संघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजू सेठ यांनी विविध वसाहती आणि उपनगरांना भेट देत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी देण्यावर भर दिला आहे. त्यांनी मतदारांना काँग्रेसच्या प्रचारपत्रकांचे, जाहीरनाम्याचे वाटप करून पक्षाच्या आश्वासनांची माहिती दिली. अनेक ठिकाणी नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून भगवान बुद्ध, बसवण्णा आणि आंबेडकरांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.

रामतीर्थ नगरला भेट देऊन आसिफ उर्फ राजू सेठ यांनी बसव जयंती सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी लिंगायत नेत्यांशी चर्चा करून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. समर्थनगर येथील रहिवाशांनी राजू सेठ यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी रहिवाशांनी त्यांचा सत्कार केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी राजू सेठ यांना म्हैसुरी फेटा, शाल, पुष्पहार घालून, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना राजू सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदार संघात लोककल्याणाची कामे करण्याचा आपला मानस असून, जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केला.
पक्ष आणि स्थानिक नेत्यांसह गांधीनगर आणि जवळपासच्या भागात राजू सेठ यांनी प्रचार केला.

Tags: