भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तर मतदार संघातील उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांसमवेत सदाशिव नगर, आंबेडकर नगर आदी परिसरात प्रचार केला. यावेळी छोट्या मुलांनीही पुष्पहार घालून तर महिलांनी औंक्षण करून रवी पाटील यांचे स्वागत करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
उत्तरचे भाजप उमेदवार रवी पाटील यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. आज आपले समर्थक, पक्ष कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी सदाशिव नगर, आंबेडकर नगर आदी परिसरात तुफानी प्रचार केला. घरोघरी संपर्क साधून त्यांनी, बेळगावच्या विकासासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे यावेळी छोट्या मुलांनीही पुष्पहार घालून तर महिलांनी औंक्षण करून रवी पाटील यांचे स्वागत करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचेही महिलांनी औंक्षण करून हळदी-कुंकू दिला. ‘रवी पाटील आगे बढो, हं तुम्हारे साथ है’, ‘भारमाता की जय’ आदी जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी बोलताना रवी पाटील यांनी प्रचारात मिळत असलेल्या पाठिंब्याबाबत समाधान व्यक्त केले. पहाटे 5-6 वाजल्यापासूनच प्रचाराला सुरवात करून रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करत आहे. आज सदाशिवनगर, आंबेडकर नगरात प्रचार केला आहे. मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून उन्हातही आम्ही तुफानी प्रचार करत आहोत.
यावेळी बोलताना ऍड. आर. एल. पाटील यांनी सांगितले कि, डॉ. रवी पाटील हे उच्च विद्याविभूषित आहेत. केवळ समाजाची सेवा करण्यासाठी ते निवडणूक लढवत आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या प्रचारासाठी आलोय, सर्वानी त्यांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना एका महिला मतदाराने सांगितले की, डॉ. रवी पाटील हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. कोणाबद्दलही त्यांच्या मनात किल्मिष नाही. केवळ लोकांची मदत करायची या हेतून ते राजकारणात उतरले आहेत. ते समाजाचे निश्चित भले करतील. त्यामुळे त्यांना सर्वानी निवडून द्यावे असे सांगितले.
दर्म्य, द. रवी पाटील यांनी समर्थकांसह सदशिवनगर, आंबेडकरनगर व लगतच्या परिसरात जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक संदीप जिरग्याळ, सविता कांबळे, वेंकटेश पाटील, सुनीता पाटील, भाजप महानगर सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments