Belagavi

सवदत्ती तालुक्यातील यडहल्ली आणि केंचरमनहाळ गावात भगवान बसवेश्वरांची जत्रा प्रारंभ

Share

सवदत्ती तालुक्यातील यडहल्ली आणि केंचरमनहाळ गावात भगवान बसवेश्वरांची जत्रा सुरू झाली असून आज भगवान बसवेश्वरांच्या मंदिरात विविध पूजाविधी पार पडल्या.

मंदिरांमध्ये बसवण्णांची पूजा करून , सजवलेल्या बैलांची मुख्य रस्त्यांवर आकर्षक मिरवणूक काढण्यात आली .


रथोत्सवाचे आकर्षण दुपारीहोणारा भव्य रथोत्सव डोळ्यांना पारणे फेडणारा होता . भाविकांनी रथांवर , फुले , खारीक , भंडारा उधळून गावातील आबालवृद्धांनी हार रथ ओढला .

यावेळीयडहल्ली येथील गावातील ज्येष्ठ, युवक, ग्रामपंचायत सदस्य महेश देसाई, महादेव बुदनूर, संजीव सोगल, गुरुनाथ लगमण्णावर, मुदुकप्पा बदली, बसवराज, मसनावर, बसवराज, तरलकट्टी, विठ्ठल वटवती, केंचाराम आदींनी सहभाग घेतला.

Tags: