बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे संपूर्ण मतदारसंघातून अभूतपूर्व स्वागत केले जात असून त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.
रविवारी महिला प्रचारासाठी काळेनट्टी गावात गेल्या असता त्यांचे आरती करून स्वागत करण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आगमन होताच सर्व ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. काही वेळातच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

गेल्या ५ वर्षांत म्हणावा तसा विकास झालेला आहे . तुम्हाला प्रचारात येण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला मत देतो. आम्ही तुम्हाला मागील वेळेपेक्षा जास्त फरकाने निवडून देऊ . पुन्हा पुन्हा तुम्ही आमचे आमदार म्हणून या असे जनता सांगत आहे .
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, तुमचे प्रेम आणि विश्वास पाहून मी अवाक झाले आहे. हेच प्रेम पुन्हा एकदा विधानसौधाच्या पायरीवर चढेल असा मला विश्वास आहे. यावेळी राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार हे निश्चित असून मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा अधिक विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
10 मे रोजी सर्वांनी न चुकता मतदान करावे. काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावर मतदान करून मला निवडून द्या, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी काँग्रेस पक्ष आणि स्थानिक नेते उपस्थित होते.


Recent Comments