Belagavi

बेळगाव उत्तरमध्ये भाजपचे रवी पाटील यांचा प्रचार

Share

भारतीय जनता पक्ष उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी शहरातील विविध भागात प्रचार केला. तत्पूर्वी सकाळी त्यांनी शिवजयंती व बसव जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व त्यानंतर बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर कंग्राळ गल्ली येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचे सांगत सर्वांनी रवी पाटील यांना पाठिंबा दिला.

त्यानंतर संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला रवी पाटील यांनी वंदन केले. त्यानंतर दिवसभर मारुती गल्ली, कोनवाळ गल्ली, गांधारी गल्ली मार्गे बसवन कुडची येथील मारुती मंदिरात आले.
यावेळी उत्तर मतदारसंघातील विविध भागातील नागरिकांनी डॉ.रवी पाटील यांना पाठिंबा देऊन भाजपला बहुमताने जिंकण्याचा निर्धार केला.

Tags: