election

सवदत्ती तालुक्यात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले 1600 कुकर जप्त

Share

सवदत्ती तालुक्यातील तेगिहाळ गावालगत असलेल्या सवदत्ती व रामदुर्ग तालुक्याच्या हद्दीतील एका फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले कुकर जप्त करण्यात आले.

पोलीस आणि एफएसटीने काही माहितीच्या आधारे कारवाई केली. या टीमला शनिवारी (दि. 22) दुपारी फार्महाऊसच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे 1600 कुकर आढळून आले.

जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या निर्देशानुसार एफ. एस. कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा, 1965 च्या कलम 54 अन्वये, मिळालेल्या अधिकारांचा वापर करून अधिकारी कर्मचाऱ्यांसह टीमने या शेडचा दरवाजा उघडला त्यावेळी कुकरचे बॉक्स सापडले.

Tags: