बेळगाव जिल्ह्यात सवदी विरुद्ध जारकीहोळी यांच्यात चुरशीची लढत सुरू झाली आहे. रमेश जारकीहोळी यांचा पराभव करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आता गोकाकच्या राजकीय आखाड्यात प्रवेश केला आहे. अशोक पुजारी यांना त्यांनी बंडाचा झेंडा फडकावण्यापासून रोखले आहे. गोकाकच्या भूमीवरून रमेश जारकीहोळी यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

होय…सीमेवरील बेळगाव जिल्ह्यात आता दोन तुल्यबळ नेते लक्ष्मण सवदी विरुद्ध रमेश जारकीहोळी यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाले आहे. अथणी मतदारसंघात गोकाक सावकार हे सवदींच्या विरोधात वारंवार राजकीय फासे फेकत आहेत. यावर लक्ष्मण सवदी यांनीही तोडीस तोड प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. त्यातूनच स्वतः लक्ष्मण सवदी यांनी आता गोकाक राजकारणात प्रवेश केला आहे.
आता लक्ष्मण सवदी यांनी जारकीहोळी बंधूंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. भाजपच्या रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे उमेदवार डॉ. महांतेश कडाडी यांच्या पाठीशी सवदी बलभीमासारखे उभे आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून बंडखोरी करून काँग्रेसच्या विरोधात लढायला निघालेल्या अशोक पुजारी यांचे मन वळवण्यात त्यांना यश आले आहे. माजी आमदार अशोक पट्टण आणि काँग्रेसचे एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनीही लक्ष्मण सवदी यांना पाठिंबा देत पुजारी यांना काँग्रेस पक्षातच ठेवण्यात यश मिळवून रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात पहिला राजकीय डाव टाकला आहे. बाईट लक्ष्मण सवदी
वास्तविक जारकीहोळी बंधूंनी संपूर्ण बेळगाव जिल्हा आपल्या ताब्यात ठेवला आहे. पण उमेश कत्ती यांच्यानंतर जारकीहोळी ब्रदर्सच्या विरोधात लिंगायत नेता उभा राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लक्ष्मण सवदी हे बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक चाल चालत आहेत. आता गोकाक मतदार संघात उतरून सवदींनी राजकीय फासे फेकले असून रमेश जारकीहोळी यांचा पराभव करण्यासाठी सर्व राजकीय शत्रूंना एकजूट करण्याचे काम सुरू केले आहे. तसे पाहिले तर गोकाकच्या राजकारणात आलेले पहिले लिंगायत नेते लक्ष्मण सवदी होते. पडद्यामागे लक्ष्मण सवदी यांना बेळगाव जिल्ह्यापासून ते बेंगळुरूपर्यंत कट्टर शत्रूंनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या मतांची विभागणी झाल्यास रमेश जारकीहोळी यांना लगाम घालणे शक्य नसल्याने अशोक पुजारी हे हत्यार काँग्रेसकडे ठेवून ते आजमावत आहेत. बाईट अशोक पुजारी, काँग्रेस नेते
एकंदरीत कर्नाटकच्या सत्ताकारणात रमेश जारकीहोळी विरुद्ध लक्ष्मण सवदी ही राजकीय कुस्ती दिवसेंदिवस रंगत आहे. अथणीत जारकीहोळी तर गोकाकमध्ये सवदी राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले आहेत. ही राजकीय ध्रुवीकरणाची नांदी ठरणार का याचे उत्तर येणार काळच देईल.


Recent Comments