कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये , कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने खबरदारी तसेच मतदानाचा हक्क निर्भयपणे पार पाडण्याकरता मतदारांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी , विविध ठिकाणी पोलीस विभागाकडून पथसंचलन पार पडले .

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक शहरात गोकाक पोलिसांकडून , पथसंचलन करण्यात आले . पोलीस अधिकाऱ्यांसह , पोलीस कर्मचाऱ्यांनी या पथसंचलनात सहभागी होऊन , निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश जनतेला दिला .
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील तिगडी तसेच मरीकट्टी या खेड्यांमध्येही पोलीस तसेच सशस्त्र पोलीस दलाकडून पथसंचलन करून , मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचा संदेश देण्यात आला . त्याचप्रमाणे , लोंढा येथे ही स्थानिक पोलिसांचे पथसंचलन पार पडले .
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला कोणत्याही दबावाला बळी न पडता , आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, त्याचप्रमाणे ,निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार आढळून आल्यास गय केली जाणार नाही असा इशारा दिला .


Recent Comments