मी गेल्या 5 वर्षात केलेल्या विकासकामांमुळे 2018 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी मुतगा येथे प्रचंड गर्दीत प्रचार केला. यावेळी बोलताना, मी विकास पुढे नेणार आहे आणि तुमच्याकडे मत मागणार आहे. मी एक मुलगी, मोठी बहीण, तुमच्या घरची आई म्हणून तुमचे आशीर्वाद मागत आहे. तुम्ही मला वास्तवावर आधारीत साथ द्या. कोणत्याही फसव्या शब्दांना फसू नका असे सांगत त्यांनी गेल्या वेळेपेक्षा मोठ्या फरकाने विजयी करण्याची विनंती यावेळी केली.
मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. तुमच्यासारखी माणसे मिळाल्याने मी धन्य झाली आहे. पुढची 5 वर्षेच नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करण्याचे देव मला बळ देवो हीच प्रार्थना करते असे सांगून आ. हेब्बाळकर यांनी तुमच्या नातेवाईकांना आणि परिचितांना मला मतदान करण्यास सांगा अशी सर्वांना विनंती केली.


Recent Comments