Belagavi

बेळगाव उत्तर काँग्रेसमध्ये बंडखोरी; अझीम पटवेगार अपक्ष म्हणून रिंगणात

Share

बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अझीम पटवेगार उत्तरमधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. आज समर्थकांच्या साथीने शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

गांधीनगर-अमननगर प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आलेले  नगरसेवक अझीम पटवेगार आता विधानसभा निवडणूक लढवत आहेत. बेळगाव उत्तरमधून त्यांनी आपल्या समर्थकांच्या सहभागाने शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. गांधीनगर-अमननगर भागातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मनपामधील निवडणूक कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज दाखल केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरसेवक अझीम पटवेगार म्हणाले की, गांधीनगर-अमननगर भागातील अनेक निरपराध युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. काहींना तडीपार केले आहे. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय बेळगावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, गोरगरिबांना सरकारी सुविधा वेळेवर मिळाल्या पाहिजेत, या हेतूने मी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवीत आहे असे त्यांनी सांगितले.


यावेळी नगरसेवक बाबाजान मतवाले व रियाज किल्लेदार, आबिद तालिकोटी, नझीम पटवेगार, एजाज हकीम यांच्यासह गांधीनगर, अमननगर भागातील स्त्री-पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: