election

नंदगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रचाराला प्रतीकात्मक सुरुवात

Share

काँग्रेस कार्यकर्त्यांनी नंदगडमध्ये बसप्पाण्णा अरगावी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पक्षाच्या प्रचाराला प्रतीकात्मक सुरुवात केली.

खानापूर तालुक्यातील नंदगड येथे नंदगड जिल्हा पंचायत मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवंगत बसप्पाण्णा अरगावी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. काँग्रेसच्या इतिहासात खानापूरमधून ते पहिले काँग्रेस आमदार म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर तब्बल 66 वर्षांनंतर डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदार होऊन दुसऱ्यांदा काँग्रेसचा झेंडा फडकावून काँग्रेस पक्षाला मान मिळवून दिला.

काँग्रेसचे पहिले आमदार म्हणून निवडून आलेले दिवंगत बसप्पाण्णा अरगावी यांना आदरांजली अर्पण करून प्रतिकात्मकपणे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ केला. अनिल सुतार, शफी काझी,

अल्ताफ बसरीकट्टी, सावित्री मादार, अश्विनी होसुरी, मारुती बेकने, तमन्ना कोलकार, श्वेता शिवठनकर, सत्यवा कांबळे, राजश्री चव्हाण, महांतेश कल्याणी, वैष्णवी पाटील, महेश आदी उपस्थित होते.

Tags: