election

भाजप उमेदवार निखिल कत्ती यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Share

हुक्केरी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निखिल कत्ती यांनी हुक्केरी निवडणूक अधिकारी विजयकुमार अळुरे व तहसीलदार एस.बी.इंगळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

मंगळवारी दुपारी १२ वाजता हुक्केरी प्रशासन भवन येथे , त्यांचे समर्थक अप्पासाहेब शिरकोळी, गजानन कोळी, राजेंद्र पाटील आणि खासदार इराण्णा कडाडी यांच्यासह जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमचे वडील दिवंगत उमेश कत्ती यांनी गेल्या 40 वर्षांपासून मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले असून त्यांनी केलेल्या विकासकामांची ओळख करून देत यावेळीही मतदारसंघातील जनतेने मला आशीर्वाद दिला आहे आणि यापुढेही राहणार असल्याचे सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी मदत करा.

हुक्केरी आणि चिक्कोडी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने कत्ती कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याचे खासदार इराण्णा कडाडी यांनी सांगितले.

यावेळी बंडू हतनुरे, अमर नलावडे, अण्णापा पाटील, अशोक पट्टणशेट्टी, प्रज्वाल निलजगी आदी हजारो कार्यकर्त्यांनी मिरवणुकीतून येऊन उमेदवारी अर्ज सादर केला .

Tags: