बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आसिफ उर्फ राजू सेठ यांनी स्वामीजींची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
काँग्रेसने तिसरी उमेदवार यादी जाहीर करताना बेळगाव उत्तरमधून आसिफ उर्फ राजू सेठ यांना अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. त्यानंतर आज आसिफ सेठ यांनी आज रविवारी नागनूर रुद्राक्षी मठात डॉ. सिद्दराम स्वामीजी, कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

यावेळी बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रवीण मोतीमठ, ऍड. आर. पी. पाटील, बसवराज शेगावी, सुरेश केराई, राजा सलीम आदी उपस्थित होते.


Recent Comments