meeting

जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा, विक्रमी मतांनी जिंकेन : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

शिग्गाव मतदारसंघात मला नेहमीच अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. मतदारसंघातील जनतेने अनेकवेळा आशीर्वाद देऊन पाठिंबा दिला आहे. त्यावेळेसही पूर्वीचा विक्रम मोडून जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याचा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

शिग्गाव तहसील कार्यालयात 2023 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बोम्मई म्हणाले, या तालुक्यातील मतदार सक्रिय व जागरूक मतदार आहेत. या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार संघातील जनतेने कौल दिला आहे. आम्ही सर्व वर्गाचा समान विकास करण्यावर भर दिला आहे. गेल्या वेळेपेक्षा यंदा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे. नवीन उद्योग, टेक्सटाईल पार्क, आयआयटी, आयुर्वेदिक हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्प येथे राबवले आहेत. त्यामुळे लोकांचा पूर्वीपेक्षा जास्त पाठिंबा आहे. आम्ही सत्ताधारी असल्याने अनेक इच्छुक आहेत. विद्यमान आमदार बदलले की बंडखोरी स्वाभाविक आहे. दोन-तीन दिवसांत सर्व काही सुरळीत होईल. ही शेवटची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोम्मई पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात निवडणूक हा कुस्तीचा सामना आहे, विरोधक कोणीही असो, विरोधक प्रबळ असेल तर निवडणूक चांगलीच रंगते. माझ्या मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. दहा जणांनी निवडणूक लढवली, लोकांनी मला पाठिंबा दिला. मी 19 एप्रिलला पुन्हा उमेदवारी अर्ज सादर करेन. त्यावेळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा येणार आहेत. नेहरू ओलेकर यांनी माझ्यावर जे आरोप केले ते त्यांना सिद्ध करू द्या. मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. मात्र, त्यांनी आधी आपल्यावरील आरोपांबाबत खुलासा करावा, असे म्हणाले.

एकंदर, शिग्गाव मतदारसंघातली निवडणूक आपल्यासाठी कुस्ती असून, यावेळी विक्रमी मतांनी निवडून येण्याचा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलाय.

Tags: