विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर शहर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
बसनगौडा पाटील यांनी विजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
उद्यापासून पंचक सुरू होणार असल्याने त्यांनी आज प्रतीकात्मकपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. एक सूचक म्हणून मडिवाळप्पा करडी, उमेदवार एजंट गुरुपादैया गच्छिनमठ, वकील सतीशचंद्र कुलकर्णी, एन.एम.पट्टी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. 18 एप्रिल रोजी पुन्हा उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे यत्नाळ यांनी सांगितले.


Recent Comments