माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या भाजपमधून काँग्रेसमध्ये केलेल्या पक्षप्रवेशानंतर , आता अनिल बेनके देखील त्याच वाटेवर आहेत का असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून कोणाला पडला तर वावगे ठरणार नाही . मात्र बेळगाव जिल्ह्यात बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत आणि ते राजकीय उलथापालथ करतील का ? अशी साशंकता निमार्ण होऊ लागली आहे .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगावच्या आंबेडकर उद्यानात सर्व पक्षाचे तिकीट मिळालेले आणि तिकिटापासून वंचित राहिलेले उमेदवार , आंबेडकराना अभिवादन करण्यासाठी जमलेले होते . यात विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे , काँग्रेसचे माजी आ . फिरोज सेठ आणि भाजपचे विद्यमान परंतु यावेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले आ . अनिल बेनके हस्तांदोलन करून , हसतमुखाने बोलत होते . फिरोज सेठ यांनी आ . अनिल बेनके यांच्या खांद्यावर हात टाकून आंबेडकर पुतळ्यापर्यंत गेल्याचे दृश्य पाहून अनेक अफवांना आता ऊत आला आहे . त्यांच्या या मैत्रीपूर्ण संवादातून ते ” हम साथ साथ है ” हे भासवून देत होते .
भाजपने उमेदवारी नाकारल्याने आता , आ . अनिल बेनके देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे . पण यात कितपत सत्यता आहे हे त्यांनाच माहित .. मात्र तिकिटापासून वंचित असलेले उमेदवार , नाराज होऊन लक्ष्मण सवदी यांच्यासारखी काँग्रेसची वाट धरणार का हे आता पाहावे लागेल .
आता काँग्रेसने तर लक्ष्मण सवदी याना काँग्रेसने आपल्या गोटात सामील करून घेतले आहे . आणि आता त्यांच्या माध्यमातून आणखी किती नाराज उमेदवार काँग्रेसच्या गळाला लागतात हे पाहावे लागेल


Recent Comments