अथणी मतदार संघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री व विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी आज विशेष विमानाने बेंगळूरला रवाना झाले. बेंगळूरमध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष डीकेशी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सायंकाळपर्यंत ते काँग्रेसमध्ये डेरेदाखल होतील अशी अपेक्षा आहे.

होय, गेल्या मंगळवारी रात्री उशिरा भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली. त्यानंतर लगेचच बुधवारी दुपारी दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. या दोन्ही याद्यांत अथणी मतदार संघात सवदी याना अथणीतून वगळण्यात आल्याने ते दुखावले आहे. त्यामुळे त्यांनी समर्थक, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गेले दोन-तीन दिवस संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून चर्चेचा विषय बनलेल्या माजी उपमुख्यमंत्री सवदी यांचा आज काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात आहे. यासंदर्भात त्यांनी आज बेळगावातील सांबरा विमानतळावरून विशेष विमानाने बेंगळूरला प्रयाण केले.
सवदी यांना बेंगळूरला नेण्यासाठी आलेले खासगी विमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नावाने बुक करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी देखील सवदींच्या सोबत बेंगळूरला रवाना झाले आहेत.
बेंगळूरमध्ये केपीसीसी कार्यालयात आज दुपारी लक्ष्मण सवदींचा अधिकृत काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता आहे.


Recent Comments