Belagavi

सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशाला आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा दुजोरा

Share

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे एवढ्यात त्याबद्दल काही सांगता येणार नाही, तितकी मी मोठीही नाही असे सांगत बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेळगावातील आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर आ. हेब्बाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, विविध पक्षातून अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत हे सर्वाना ठाऊक आहेच, सवदी काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करून योग्य निर्णय घेतील. याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे त्यावर एवढ्यात फार काही बोलता येणार नाही. ते बोलण्याएवढी मोठीदेखील मी नाही. हायकमांड यावर योग्य निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. त्यांनी कोणातही भेद केला नाही. सर्वाना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक क्रांतीचे प्रणेते असलेल्या बाबासाहेबांना आज अभिवादन केले आहे असे त्यांनी सांगितले.

Tags: