अथणीमध्ये लक्ष्मण सवदी यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते, चिकोडी भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश नेर्ली यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी चिकोडी भाजप जिल्हाध्यक्षांना सवदी समर्थकांनी धारेवर धरले . पक्षाने सवदींवर अन्याय केला आहे . आता कशाला आलात अशी त्यांनी विचारणा करीत आता राजीनामा घ्यायला आलात का अशी नाराजी व्यक्त केली .

सवदी यांच्या घरी आलेल्या भाजप जिल्हाध्यक्षांसह , आर एस एस चे जयप्रकाश यांचा लक्ष्मण सवदी सत्कार केला .
भाजप आणि आर एस एस प्रमुखाना फैलावर घेत , कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला . सवदीना तिकीट का दिले नाही असा प्रश त्यांनी केला . यावेळी कार्यकर्त्यांनी कार अडवून , मोठा गोंधळ घातला .
लक्ष्मण सवदीना तिकिटापासून वंचित ठेवण्यात आल्याने, सर्मथकांनी तीव्र संताप व्यक्त केला . मात्र या कार्यकर्त्यांच्या गोंधळात सवदी यांनी घरी आलेल्या या भाजपच्या पाहुण्यांना गाडीपर्यंत जाऊन सोडले .


Recent Comments