Chikkodi

रमेश कत्ती लढवणार गणेश हुक्केरी विरुद्ध निवडणूक

Share

चिक्कोडी सदलगा मतदारसंघातून विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यात भाजपला यश आले आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत माजी खासदार रमेश कत्ती यांची चिक्कोडी सदलगा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसचा थेट भाजपशी सामना होणार यात शंका नाही. स्थानिक नेत्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यापासून माघार घेतल्याने भाजपच्या नेत्यांनी रमेश कत्ती यांना चिक्कोडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यास राजी केले.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रमेशकत्ती हे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विरोधात पराभूत झाले होते. नंतर 2019 मध्ये रमेश कत्ती चिक्कोडी सदलगा मतदारसंघातून विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यात भाजपला यश आले आहे.

Tags: