Hukkeri

बिरापूर चेकपोस्टवर 3,88,500 ची रोकड जप्त

Share

जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बिरापूर चेकपोस्टवर एफएसटी अधिकारी आणि पोलिसांनी बेकायदेशीरपणे नेण्यात येणारी 3,88,500 रोकड जप्त केली.

कोल्हापुरातील जमादार नावाची व्यक्ती 3,88,500 रोकड बेकायदेशीरपणे घेऊन जात असताना, बिरापुर चेकपोस्टवर तपासणी करणाऱ्या एफएसटीच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी ही रोकड जप्त केली.

यावेळी संकेश्वर सीपीआय प्रल्हाद चेन्नगेरी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात संकेश्वर पोलीस ठाण्यात सीआर क्रमांक-१०३/२३ यू/एस ९८ केपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: