विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील नंदगड येथे आज सशस्त्र सीमा दल व नागरी पोलिसांचे पथसंचलन पार पडले.

नंदगडचे पोलीस निरीक्षक बसवराज लमाणी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन करण्यात आले. नंदगड पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले हे संचलन नंदगड गावातील केईबी ऑफिस, बस स्थानक ते बाजार पेठेमार्गे कलाल गल्लीमार्गे गावातील प्रमुख रस्त्यांवरून पार पडले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, निवडणूक काळात गैरप्रकार रोखणे यासाठी पथसंचलन करण्यात आले. निरीक्षक बसवराज लमाणी यांनी त्यांच्या कर्मचार्यांच्या सहकार्याने.एसएसबी सशस्त्र सीमा दलाने एकत्रितपणे, सुव्यवस्थित संचलन पार पाडले.


Recent Comments