उगार नगरपालिकेच्या अंतर्गत फरीद खानवाडी गावातील ग्रामदैवत श्री लक्ष्मी मंदिरासमोर 25 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या समुदाय भवनाच्या बांधकामाचे आमदार श्रीमंत पाटील यांनी भूमिपूजन केले .

आमदार श्रीमंत पाटील यांनी नगरोत्थानच्या विशेष अनुदानातून समुदाय भवन बांधण्यासाठी भूमिपूजन आयोजित केला होता.
उगार नगरपालिकेचे अधिकारी सुनील बबलादी, माजी सैनिक व नगरपालिका सदस्य राजू पाटील प्रकाश थोरुशे , प्रफुल यांच्या विशेष प्रयत्नाने येथील जनतेची अनेक वर्षांची मागणी आमदार श्रीमंत पाटील यांनी पूर्ण केली आहे.
आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या काळात माझ्या राजकीय जीवनामध्ये विकास कामात कधी जातिभेद केलेले नाही या मतदारसंघातील विकास कामासाठी फक्त रस्ता दुरुस्तीसाठी 240 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर करून आणलेले आहे . मी सातत्याने विकासकामे केली आहेत, मी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता जनतेच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले.
या समारंभात भाजपचे चिक्कोडी जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, प्रफुल्ल थोरुषे , महादेव कटगेरी, रावसाहेब कटगेरी, वीरभद्र कटागेरी, रामचंद्र थोरुषे, प्रकाश थोरुषे, मल्लेश मल्लेवाडी, प्रमोद लाड आदी उपस्थित होते.


Recent Comments