Belagavi

आ. अभय पाटील यांच्याहस्ते व्हॅक्सिन डेपोत द. रा. बेंद्रे खुल्या रंगमंदिराचे उद्घाटन

Share

बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपोमध्ये द. रा. बेंद्रे खुल्या रंग मंदिराचे उद्घाटन रविवारी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते झाले.

प्रसिद्ध कन्नड व मराठी कवी द. रा. बेंद्रे यांच्या नावाने बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपोमध्ये द. रा. बेंद्रे खुल्या रंग मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन करून बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, बेळगावातील जनतेला असे ओपन एअर थिएटर नव्हते.

त्यामुळे ओपन एअर थिएटर बांधण्यात यावे, ही कलाकारांची व रसिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याची दखल घेऊन हे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. येथे नाट्य उपक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे सोयीचे होईल. कलाकारांनीही या ओपन एअर थिएटरचा लाभ घ्यावा. याशिवाय वायु विहारासाठी येणारे लोक त्याचा योगासाठी वापर करू शकतात, असेही ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, स्मार्टसिटी एईई अजित पाटील, गणेश मळलीकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर कोल्हापूर येथून आलेल्या व स्थानिक कलाकारांकडून शहीद जवानांच्या स्मरणार्थ देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Tags: