आपण सुक्षेत्र सवदत्ती यल्लम्मा मतदारसंघात भाजप पक्षाच्या तिकीटासाठी इच्छुक असल्याचे बसवराज पट्टणशेट्टी यांनी सांगितले .
शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले कि , विजय संकल्प यात्रेत नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजप हायकमांड कौटुंबिक राजकारणापुढे झुकणार नाही. त्यामुळे ते नव्या चेहऱ्याला संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी गेल्या 8 वर्षांपासून सवदत्ती येथे पक्षसंघटनेचे खूप काम केले आहे. मतदारसंघातील महिला व तरुणांच्या अडचणींना उत्तर देऊन पक्षश्रेष्ठींना माझ्या कामाची खात्री पटली आहे. याशिवाय माझ्यासह भाजपचे 8 इच्छुक आहेत. यावेळी पक्ष नवा चेहरा देईल, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
महांतेश हादिमनी, सुनिल केलगडे, सी.एन.कुलय आदी उपस्थित होते.


Recent Comments