राजू किरणगी हे देवावर नितांत श्रद्धा असलेले युवा नेते आहेत . भगवंताची सेवा त्यांच्याकडून अखंड घडो . युवकांनी सहकार्य करावे, असे क्यारगुड्ड येथील अभिनव मंजुनाथ स्वामीजी म्हणाले.

रायबाग तालुक्यातील सौंदत्तीवाडी गावातील रायबागचे युवा नेते राजू किरंगी यांनी श्री हनुमान मंदिराच्या कळसाच्या उभारणीसाठी ४.२५ लाख रुपयांची देणगी दिली. या कामकाजाचा प्रारंभ करून बोलताना स्वामीजी म्हणाले कि , राजू किरणगी यांनी अखंड जनसेवा करावी ,तसेच मंदिरांच्या विकासासाठी सहकार्य द्यावे . . सर्व तरुणांनी भक्तीमार्गावर चालावे. वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. आरोग्य चांगले राहिल्यास जीवन आनंदी होईल. सर्व तरुणांनी संघटित व्हावे. आपण एकत्र काम केल्यास काहीही अशक्य नाही, असे ते म्हणाल

हनुमान समितीने अभिनव मंजुनाथ स्वामीजींचा गौरव केला. यावेळी नेते साताप्पा बने, गावातील ज्येष्ठ अण्णाप्पा खोत, इटाप्पा सिंगाडे, शंभू बेणे, राजू पाटील, रत्नाप्पा खोत, महावीर बने, रावासाब बने, रमेश खोत, दयानंद खोत, जगदीश माळी संदीप खोत, मनोहर सिंगाडे, अमिता अंगडी, साताप्पा बाणे आदी उपस्थित होते. ,नविन माळी., सचिन बने, सदाशिव तांगडी , रमेश खोत, दयानंद खोत, अण्णासाहेब खोत, युवक, वडील व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments