आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जांबोटी-आमटे येथील कित्तूर राणी चन्नम्मा कन्या निवासी शाळेचे उद्घाटन करून ते विद्यार्थिनींना अर्पण केले.

आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी गेल्या आठवड्यात बेकवाड जवळील शाळेला भेट देऊन विद्यार्थिनीशी बोलून तिच्या शिक्षणाची माहिती घेतली.
आमच्या शाळेच्या नवीन इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करून व्यवस्था करावी अशी विनंती विदयार्थींनीनी केली . येथील शिक्षणाची होणारी गैरसोय विदयार्थींनीनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली व लवकरात लवकर निवासी शाळा नवीन इमारतीत स्थलांतर करण्याची विनंती केली.

दोन-तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन होणार असलेल्या या इमारतीचे उदघाटन राजकारण व अन्य कारणांमुळे झाले नाही, तसेच विद्यार्थिनींचे हालहवाल समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही, या कारणास्तव आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
या शाळेच्या इमारतीमध्ये एक सुसज्ज कॅन्टीन, मुलींसाठी दोन सुसज्ज इमारती, कर्मचाऱ्यांसाठी दोन इमारती, मुख्याध्यापकांसाठी घर, खेळाचे मैदान इ. सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत .


Recent Comments