उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देऊन गोड बातमी न दिल्यास विधानसभा निवडणुकीत धडा शिकविला जाईल, असे पंचमसाली समाज जिल्हा युवा संघाचे अध्यक्ष राजशेखर के. पाटील यांनी सांगितले.
बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राजशेखर के. पाटील म्हणाले की, पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही संघर्ष, आंदोलन करत आहोत. पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देणार असल्याचे सांगून अनेकवेळा सरकारने नाकाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. बंगळुरच्या फ्रीडम पार्कमध्ये पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुडलसंगम स्वामीजी 69 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही. 24 मार्च रोजी विधानसौध, बंगळुरू येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा स्वामीजींनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत, असे ते म्हणाले.
बेळगाव उत्तर मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांनी पंचमसाली समाजाच्या नेत्यांना तिकीट द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. बाईट
यावेळी पंचमसाली समाज आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments