Raibag

मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणाऱ्या 16 लाखांच्या साड्या जप्त

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात आलेल्या ट्रकभर साड्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.

प्रत्येकी 350 रुपये किमतीच्या 5000 साड्या सापडल्या. त्यांची एकूण किंमत 16 लाख आहे. ती घेऊन जाणारी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले मनोहर पत्तार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वाहन अडवून चौकशी केली. तेव्हा चालकाने समर्पक उत्तर दिले नाही.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय या ट्रकमधून या साड्या नेण्यात येत होत्या. या प्रकरणी चालक कदीर दावर शेख (60) आणि वसंत कांबळे (50, रा. हुंकार कॉलनी, उचगाव, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर ) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Tags: