बेळगाव दक्षिण मतदार संघात सत्तारूढ आमदारांकडून जनतेवर अन्याय केला जात आहे. तो दूर करण्यासही येत्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे या मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचा मनोदय बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेस नेते ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी जाहीर केलाय.
बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी हा निर्णय जाहीर जाहीर केला. ते म्हणाले, बेळगाव दक्षिण मतदार संघात सत्तारूढ आमदारांची मनमानी, जनतेव अन्याय सुरु आहे. बेळगाव दक्षिणसाठी स्वतंत्र सब रजिस्ट्रार ऑफिस सुरु करण्यास आमचा विरोध नाही. मात्र जनतेला उत्तर किंवा दक्षिण कोणत्याही सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री नोंदणीची मुभा द्यावी अशी आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही महसूल मंत्र्यांना पत्रही लिहिले होते. मात्र आमदारांनी त्यात मोडता घातला असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी एका व्यावसायिकाला खोट्या खून प्रकरणात अडकवले. 12 वकिलांवर विनाकारण दलित अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याला आम्ही हायकोर्टातून स्थगिती आणली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून अनेक निष्पाप लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले आहे. तेथील लोक, बिल्डर्स, व्यापारी भीतीच्या छायेखाली जगत आहेत असे त्यांनी सांगितले.
वादग्रस्त जागेवर मालिनी सिटी उभारल्याचा आरोप करून यत्नट्टी म्हणाले की, या जागेच्या मालकाला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जबरदस्तीने जमीन लिहून घेतली आहे. तेथे मोदींसारख्या महान व्यक्तीला आणून आमदारांनी कार्यक्रम घेतला. याची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला देणे आवश्यक होते. मात्र आमदारांच्या दबावाखाली अधिकारी मूग गिळून बसले. याबाबत आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
6 लाखांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्याबद्दल लिंगायत समाजाच्या एका डॉक्टरना बेळगाव महापालिकेने शेख होमिओपॅथी कॉलेजसमोर जागा मंजूर केली होती. पण काही महाभागांनी तेथे विवेकानंद ट्रस्ट करून त्या नावाखाली जागा बळकावल्याचा आरोप त्यांनी केला. दक्षिण मतदार संघातील जनतेकडून आपल्याला निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी सांगितले.
एकंदर, बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढवून सक्रिय राजकारणात येण्याचा मनोदय ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी व्यक्त केलाय.


Recent Comments