खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र नायक हे त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहेत. नव्या कारवाईत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत छापा टाकून 15 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

यावेळी आरोपी फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पीएसआय प्रकाश राठोड, एएसआय के. आय. बडीगेर, जे. ए. हमण्णवर, के. एम. सनदी, जे. आय. काद्रोळी, आय. एन. जिन्नवागोळ, एम. एल. मुसळी, एस. ए. सतप्पनवरा, व्ही. एम. बांगी यांचा सहभाग होता.


Recent Comments