भारतीय बेळकू पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक बेळगाव जिल्ह्यातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक पुट्टस्वामी गौडरू यांच्या उपस्थितीत जितेंद्र चव्हाण विधानसभेचे बेळगाव शहर उत्तर उमेदवार तर बेळगाव ग्रामीणमधून कंग्राळीचे उमेदवार मल्लिकार्जुन पासलकर उमेदवार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
बेळगावात वैभव नगर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या उमेदवारांची घिष्ण करण्यात आली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक पुट्टस्वामी गौडरू, प्रदेशाध्यक्ष मनोहर बी.एम., राज्य सरचिटणीस आर, राजशेखर, राज्य संचालक व्ही.सी.महादेवस्वामी आणि बेळगाव जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
बेळगाव उत्तर आणि ग्रामीण मतदार संघातील मतदारांना भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रशासन, सरकारी सुविधा मिळवून देण्यासाठी भारतीय बेळकू पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments