हुक्केरी शहरात , लक्ष्मीदेवी जत्रेनिमित्त बडिगेर गल्लीत पारंपारिक पूजा करून , देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली . पहाटे सुवासिनींनी देवीची पूजा केल्यानंतर देवीला गदगेवर विराजमान केले.

पाच दिवसीय जत्रेसाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर व स्वागत कमानी लावून भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे.
रात्री नऊ वाजता देवीची मूर्ती , गुलाल भंडारा उधळत , हक्कदारांच्या घरोघरी फिरवण्यात आली व सकाळी मूर्ती रथात विराजमान करण्यात आली .
दुपारी भाविकांनी देवीचे दर्शन घेतले .

या जत्रोत्सवानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हुक्केरीचे पोलीस निरीक्षक रफीक तहसीलदार, यमकनमर्डीचे निरीक्षक रमेश छायागोळ , संकेश्वरचे निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस दलासह शेकडो जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हुक्केरी लक्ष्मी देवी जत्रेची जयंती तीन दिवस शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असल्याचे जत्रा समितीचे अध्यक्ष बापू नाईक व सुभाष नाईक यांनी सांगितले.
एकंदरीत हुक्केरी शहरात , श्री लक्ष्मी देवीचा जत्रोत्सव मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात साजरा केला जात आहे .


Recent Comments